म्हैसूर (कर्नाटक) - म्हैसूर पॅलेस येथील वार्षिक शरणनवरात्री उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे खास दरबार किंवा खासगी दरबार. आज सकाळी 10.45 ते 11.05 च्या दरम्यान भव्य दरबार हॉलमध्ये राजघराण्यातील प्रमुख यदुवीर कृष्णदत्त चमराजा वाडियार यांच्या सुवर्ण सिंहासनावर बसण्याने याचा प्रारंभ झाला.
सकाळी 10.35 वाजता यदुवीरला तेल-स्नान शास्त्राद्वारे खासगी दरबारचे विधी सुरू झाले. पहाटे 6.15 ते 6.30 च्या दरम्यान सोन्याच्या सिंहासनावर सिंहाची मस्तके ठेवण्यात आली. 4 ऑक्टोबरला सिंहासन (सोन्याचे) आणि भद्रासन (चांदीचे सिंहासन) एकत्र आणण्यात आले. सिंहासन दरबार हॉलमध्ये ठेवण्यात आले, तर, भद्रासन कन्नडी थोटी येथे ठेवण्यात आले आहे.
विधी झाल्यावर सकाळी 7.75 ते 8.15 दरम्यान यदुवीर यांना कंकण बांधण्यात आले. परंपरेनुसार, एकदा कंकण बांधल्यानंतर राजघराण्यातील प्रमुखाला दहा दिवस केवळ पॅलेसमध्येच रहावे आणि वावरावे लागते.
हेही वाचा -चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन, नंतर असे घडले नाट्य...