तिरुवनंतपुरम - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या आहेत. केरळ सरकारने अतिरिक्त महसूल मिळविण्यासाठी भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (आयएमएफएल) च्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या किंमतीत वाढ ; केरळ सरकारचा निर्णय
केरळ सरकारने अतिरिक्त महसूल मिळविण्यासाठी भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (आयएमएफएल) च्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. बिअर आणि वाइनसाठी 10 टक्के कर आणि इतर सर्व प्रकारच्या करांमध्ये 35 टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्या आयएमएफएलवरील विक्री कर 400 रुपयांपर्यंतच्या ब्रँडसाठी 202 टक्के आणि त्यापेक्षा जास्त ब्रँडसाठी 212 टक्के आहे. नव्या दरासह ही टक्केवारी अनुक्रमे 237 आणि 247 टक्क्यांवर जाईल.
राज्य मंत्रिमंडळाने आयएमएफएलवरील विक्रीकर वाढविण्यासाठी अध्यादेश काढण्याची शिफारस राज्यपालांना केली. बिअर आणि वाइनसाठी 10 टक्के कर आणि इतर सर्व प्रकारच्या करांमध्ये 35 टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्या आयएमएफएलवरील विक्री कर 400 रुपयांपर्यंतच्या ब्रँडसाठी 202 टक्के आणि त्यापेक्षा जास्त ब्रँडसाठी 212 टक्के आहे. नव्या दरासह ही टक्केवारी अनुक्रमे 237 आणि 247 टक्क्यांवर जाईल.
लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचे सर्व प्रमुख उत्पन्नाचे पर्याय बंद झाले आहेत. जीएसटी महसूल मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने महसूल निर्मितीसाठी हा निर्णय घेतला आहे, 'असे राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.