तिरुअनंतपुरम - कोविड - 19 महामारीच्या सर्व प्रकारच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर केरळने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. केरळमध्ये सहा हजार ऑनलाईन वर्ग घेण्यात आले, ज्यात पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पाठ्यक्रम त्यांना शिकवण्यात आले. याचा तब्बल 43 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
'फर्स्ट बेल' हा डिजिटल वर्ग नियमित वर्गांसाठी अंतरिम व्यवस्था म्हणून 1 जून 2020 पासून सुरू झाला आणि सरकारी मालकीच्या केआयटीई व्हिक्टर्स (KITE VICTERS) (केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड टेक्नोलॉजी फॉर एज्युकेशन) अंतर्गत शैक्षणिक वाहिनीमार्फत चालवण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इयत्ता 10 वीच्या सर्व वर्गांचे प्रसारण 17 जानेवारीपर्यंत आणि 12 वीच्या वर्गांचे प्रसारण शनिवारपर्यंत पूर्ण झाले.
आजपर्यंत, केआयटीईने 'फर्स्ट बेल प्रोग्रॅम'चा भाग म्हणून 6 हजार 200 क्लास व्हिडिओ विकसित केले आणि प्रसारित केले आहेत. यामध्ये 3 हजार 100 तासांपेक्षा जास्त काळ शैक्षणिक विषय शिकवण्यात आले.
हेही वाचा -हिमोत्सवात कलाकारांची अनोखी कलाकृती, लोक आश्चर्यचकित
प्रत्येक विषयाचे केंद्रबिंदू सामान्य शिक्षण विभागाने प्रकाशित केले होते. त्या आधारे, 31 जानेवारीपासून उजळणी वर्ग आयोजित केले जात आहेत.
'सुरुवातीला आम्ही फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठी फर्स्ट बेल कार्यक्रमाची योजना आखली. पण कोविड -19 च्या परिस्थितीमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षात याच प्रकारे शिकवण्याची गरज निर्माण केली,' असे केआयटीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. अन्वर सदत म्हणाले.