केरळ- एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाक्कुलम येथील अॅग्रो, फळ प्रोसेसिंग कंपनीत कोरोनाच्या पार्श्वभूमावर दारू (वाईन) निर्मिती सुरू केली जाईल, असे केरळचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनील कुमार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-#लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
केरळमध्ये मोठ्या प्रमाणात अननसाची शेती केली जाते. लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्याच्या अननसाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अननस वापरुन मोठ्या प्रमाणात दारू बनविण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारचा वाईन निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीबरोबर काम करण्याचा मानस आहे. उत्पादन शुल्क विभागाची मान्यता मिळाल्यानंतर राज्याचे पहिले वाईन बनविणारे युनिट एर्नाकुलममधील वाझाक्कुलम अॅग्रो, फळ प्रोसेसिंग कंपनी येथे सुरू होईल, असे कृषिमंत्री व्ही. एस. सुनील कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 17 वा दिवस आहे.