महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारगिल : एका बाजूने शत्रू तर दुसऱ्या बाजूने दरी, प्रतिकूल परिस्थितीतील जवानाची शौर्यगाथा

गोरखा रेजीमेंटमध्ये असलेले जवान कैलाश क्षेत्री यांची जबाबदारी सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची होती. यावेळी शत्रूंना आपला ठिकाणा कळू नये म्हणून क्षेत्री गाडीची लाईट बंद करुन शस्त्रास्त्रे पुरवायचे.

By

Published : Jul 22, 2019, 11:56 AM IST

कारगिल

देहरादून- कारगिल युद्धाला 20 वर्ष उलटून गेली. युद्धात शौर्याने लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या वीर जवानांना देश अजूनही आठवणीत ठेवतो. कारगिल युद्धात लढलेल्या वीर जवानांच्या अनेक शौर्यगाथा आहेत. अशीच एक शौर्यकथा तत्कालीन गोरखा रेजीमेंटमध्ये असलेले जवान कैलाश क्षेत्री यांची आहे. कारगिल युद्धादरम्यान क्षेत्री यांची जबाबदारी सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची होती.

जवान कैलाश क्षेत्री

युद्धादरम्यान सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम क्षेत्री यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पहाडी भागात पाकिस्तानने ताबा मिळवला होता. तसेच भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यामध्ये गोळीबार सुरु असायचा. अशावेळी गोळीबार सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन क्षेत्री यांना शस्त्रास्त्रे भारतीय सैनिकांपर्यत पोहोचवायचे होते. अशा वेळी गाडीची लाईट बंद करुन युद्धक्षेत्रात जाण्याचा क्षेत्री यांनी निर्णय घेतला. पहाडी भागातून गाडी चालवावी लागत असल्याने धोका मोठा होता. एका बाजुला दरी असल्याने जोखीम होती. यावेळी देशासाठी जीव मुठीत घेऊन असा धोका पत्करला असल्याचे क्षेत्री सांगतात. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना अभिमान असल्याचे चेहऱ्यावर साफ दिसत होते.

युद्धकाळात जवानांमध्ये उत्साह खूप होता. देशासाठी बलीदान देण्याची सगळ्यांची तयारी होती. शत्रूचा पराभव करणे हे एकच जवानांसमोर होते, असे ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत क्षेत्री सांगत होते.

युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर जवानांमध्ये एकीकडे विजयाचा जोश भरला होता तर दुसरीकडे शहीदांसाठी डोळ्यात पाणी भरले होते. शहीदांनी दिलेले बलीदान अतुलनीय असल्याचे क्षेत्री सांगतात. तसेच पुन्हा एकदा संधी मिळाली तर देशासाठी लढायला नक्की जाईन, असं ते म्हणाले.

शहीद जवानांसाठी सरकारने जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करावी जेणे करुन नवीन येणाऱ्या पीढीला सैन्यात येण्याची प्रेरणा मिळत जाईल, असं क्षेत्री यांनी आवर्जून सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details