महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाल्यास 'हे' होतील मुख्यमंत्री

'राज्यपालांकडे याविषयी सर्वोच्च अधिकार असून घटनात्मक तरतुदीनुसार त्यांनी आम्हाला आमंत्रित केल्यास आम्ही सत्ता स्थापन करू. आम्हाला विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळाल्या होत्या. जनता आमच्यासोबत आहे,' असेही सदानंद गौडा म्हणाले.

सदानंद गौडा

By

Published : Jul 6, 2019, 4:50 PM IST

बंगळुरु - 'कर्नाटकात नवीन सरकार स्थापनेची वेळ आली तर निवडणूकीत सर्वाधिक मते मिळालेला पक्ष या नात्याने आम्ही पुढे येऊ. भाजपला राज्यात सत्ता स्थापनेची संधी मिळाल्यास बी. एस. येदियुराप्पा हे मुख्यमंत्री होतील,' असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.

'राज्यपालांकडे याविषयी सर्वोच्च अधिकार असून घटनात्मक तरतुदीनुसार त्यांनी आम्हाला आमंत्रित केल्यास आम्ही सत्ता स्थापन करू. आम्हाला विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळाल्या होत्या. जनता आमच्यासोबत आहे,' असेही सदानंद गौडा म्हणाले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा यांनी कर्नाटकचे जलसंधारण मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर राजीनामा देण्यासाठी आलेल्या आमदारांचे राजीनामे फाडून टाकल्याचा आरोप केला आहे. 'सभापतींच्या कार्यालयात शिवकुमार कसे वागत आहेत, हे सर्वजण पाहात आहेत. त्यांनी काही आमदारांचे राजीनामे फाडून टाकले. हे अत्यंत चुकीचे आहे,' असे येदियुराप्पा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details