नवी दिल्ली - जवहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची निवडणूक सुरू आहे. मतदान झाल्यानंतर काल(शनिवारी) दुपारपासून मतमोजणी सुरू झाली आहे. या मजमोजणीमध्ये डावा गट आघाडीवर आहे. मात्र, या निकालावर दिल्ली उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत स्थगिती आणली आहे.
जवहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची निवडणूक जेएनयूच्या निवडणुकांमध्ये डावा गट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काट्याची टक्कर आहे. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत निकालावर स्थगिती आणली आहे, त्यानंतर निकाल कधी लागेल हे समजणार आहे.
डाव्या गटाची सरशी
विद्यार्थी संघटनांकडून निकालाबाबत माहिती मिळत आहे. विद्यार्थी संघटनेमधील प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, आणि जनरल सेक्रेटरी सर्व जागांवर डाव्या पक्षाचे उमेदवार पुढे आहेत, असा दावा डाव्या संघटना करत आहेत. डाव्या गटाचे सर्व उमेदवार मतमोजणीत पुढे असल्याचेही डाव्या पक्षाचे नेते म्हणत आहेत.
ज्वाइंट सेक्रेटरी पदासाठी उभे असलेले डाव्या पक्षाचे उमेदवार मोहम्मद दानिश यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. निकालाचे कल बाहेर येत आहेत. त्यावरून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, जेएनयुमध्ये डाव्या पक्षांचा झेंडा फडकेल. डाव्या गटांनी केलेल्या कामांमुळे कायमच विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. जेएनयूला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आम्हाला मतदान केले आहे. आम्हाला विश्वास आहे, विद्यार्थी आम्हालाच निवडून देतील, असे दानिश यांनी सांगितले.