महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बेपत्ता झालेल्या सात गिर्यारोहकांचे मृतदेह आढळले

सापडलेल्या सात मृतदेहांपैकी एक मृतदेह महिलेचा आहे. चढाईदरम्यान झालेल्या हिमस्खलनामुळे आठजण बेपत्ता झाले होते. उर्वरित एका गिर्यारोहकाचा शोध सुरू आहे.

सात गिर्यारोहकांचे मृतदेह आढळले

By

Published : Jun 23, 2019, 11:43 PM IST

डेहराडून - साधारण तीन आठवड्यापूर्वी नंदा देवी पर्वतावर हिमस्खलन झाल्याने बेपत्ता झालेल्या आठ परदेशी गिर्यारोहकांपैकी सात जणांचे मृतदेह आयटीबीपीच्या पथकास रविवारी आढळले. तर, उर्वरित एका गिर्यारोहकाचा शोध सुरू आहे.

सापडलेल्या सात मृतदेहांपैकी एक मृतदेह महिलेचा आहे. आयटीबीपीचे पथक अद्यापही माहिती गोळा करत आहे. १३ मे रोजी मुनस्यारीहून नंदादेवी पर्वताच्या पूर्व भागात चढाई करण्यासाठी १३ सदस्यांचे पथक निघाले होते. यामध्ये इंडियन माउंटेनेअरिंग फेडरेशनचे जनसंपर्क अधिकारी चेतन पांडे यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्वजण परदेशी होते.

चढाईदरम्यान झालेल्या हिमस्खलनामुळे आठजण बेपत्ता झाले होते. यानंतर राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान पाच जणांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र, ज्या ठिकाणी हे मृतदेह आढळले होते, तेथे सेनेचे हॅलिकॉप्टर पोहचणे अशक्य होते. कारण हा भाग अत्यंत दुर्गम दऱ्याखोऱ्यांचा होता. यानंतर सेना व एसडीआरएफचे पथक पायीच शोध घेण्यासाठी निघाले होते. मात्र सातत्याने सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे शोध मोहिमेत अडथळा येत होता. अखेर रविवारी या पथकास सात मृतदेह आढळून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details