महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सावधान... 'या' गावात प्रवेश केल्यास भरावा लागणार ५ हजारांचा दंड

गावाच्या बाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर ३ एप्रिल नंतर कोणीही गावात प्रवेश करू नये, गावातील कोणी व्यक्ती बाहेर जाऊ नये, जर कोणी व्यक्ती गावात प्रवेश करताना आढळला तर त्याच्याकडून ५ हजार ५१ रुपयांचा दंड आकारला जाईल, असे लिहिले आहे.

By

Published : Apr 6, 2020, 12:21 PM IST

village of Hazaribag
हजारीबाग

हजारीबाग (झारखंड)- लॉकडाऊनच्या पर्श्वभूमीवर नागरिकांकडून घरी राहणे अपेक्षित आहे. मात्र, काही नागरिक त्याचे उल्लंघन करताना दिसून आले आहे. अशांना पोलिसी हिसका दिला जात आहे. ग्रामीण भागातही लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना मज्जाव केला जात आहे. जिल्ह्यातील नावाडीह गावात बाहेरच्या व्यक्तींनी प्रवेश केल्यास त्यांना ५ हजार ५१ रुपयांचा दंड भारावा लागणार आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

गावाच्या बाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर ३ एप्रिल नंतर कोणीही गावात प्रवेश करू नये, गावातील कोणी व्यक्ती बाहेर जाऊ नये, जर कोणी व्यक्ती गावात प्रवेश करताना आढळला तर त्याच्यापासून ५ हजार ५१ रुपयांचा दंड आकारला जाईल, असे लिहिले आहे. त्यामुळे, नागरिक या गावात प्रवेश करण्यास टाळत आहेत. बॅनरबाबत गावातील नागरिकांनी बोलण्यास टाळले आहे. इतकेच नव्हे तर, हा उपक्रम आता इतर गावांनी देखील राबवायला सुरूवात केली आहे.

हेही वाचा-'सोशल डिस्टन्सिंग पाळा, नाही तर कारवाईला सामोरे जा'

ABOUT THE AUTHOR

...view details