महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आयटी सायंट' कंपनीने तयार केले 'क्वारंटाईन ट्रॅकर' अॅप!

'आयटी सायंट' नावाच्या आयटी कंपनीच्या मदतीने सरायकेला खरसावा जिल्हा प्रशासनाने एक संकेतस्थळ आणि 'क्वारंटाईन ट्रॅकर' या अॅपची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात परराज्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या हजारो कामगार आणि विद्यार्थ्यांवर यामुळे लक्ष ठेवणे प्रशासनाला शक्य झाले आहे.

Quarantine Tracker App
क्वारंटाईन ट्रॅकर

By

Published : May 9, 2020, 2:56 PM IST

रांची (सरायकेला) -देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यापूर्वी परराज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याची परवानगी राज्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे लाखो नागरिक प्रत्येक राज्यांमधून ये-जा करत आहेत. संबधित राज्य या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन सर्वांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत आहे. मात्र, नागरिक कितपत याचे पालन करतील याबाबत साशंकताच आहे. यावर पर्याय म्हणून झारखंडच्या सरायकेला खरसावा जिल्हा प्रशासनाने एका आयटी कंपनीसोबत मिळून एका अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या मदतीने क्वारंटाईन नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.

'आयटी सायंट' या कंपनीने तयार केले 'क्वारंटाईन ट्रॅकर' अॅप

'आयटी सायंट' नावाच्या आयटी कंपनीच्या मदतीने सरायकेला खरसावा जिल्हा प्रशासनाने एक संकेतस्थळ आणि 'क्वारंटाईन ट्रॅकर' या अॅपची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात परराज्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या हजारो कामगार आणि विद्यार्थ्यांवर यामुळे लक्ष ठेवणे प्रशासनाला शक्य झाले आहे.

असे काम करते 'क्वारंटाईन ट्रॅकर' -

सॉफ्टवेअरच्या माध्यमातून क्वारंटाईन केलेल्या व्यक्तिच्या मोबाईलमध्ये 'क्वारंटाईन ट्रॅकर' हे अॅप दिले जाते. त्यानंतर जीपीएसच्या माध्यमातून क्वारंटाईन केलेल्या लोकांचे लोकेशन विविध ठिकाणी तयार केलेल्या नियंत्रण कक्षांमध्ये तपासले जाते. जर क्वारंटाईन केलेला व्यक्ति घराच्या बाहेर पडला तर नियंत्रण कक्षात लगेच मेसेज जातो.

सात दिवसात तयार झाले अॅप -

'आयटी सायंट' नावाच्या आयटी कंपनीतील १० अभियंत्यांच्या गटाने सात दिवसात या 'क्वारंटाईन ट्रॅकर' अॅपची निर्मिती केली आहे. १० जणांच्या गटात २ अॅन्ड्रॉइड डेव्हलपर आणि ८ वेब डेव्हलपरर्सचा समावेश होता. या अॅपच्या मदतीने प्रत्येक १५ मिनीटाला नियंत्रण कक्षाला क्वारंटाईन व्यक्तीची माहिती अपडेट केली जाते, असे सचिन प्रामाणिक या अभियंत्यांने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details