नवी दिल्ली - ‘जय श्रीराम’च्या घोषणा सहन होत नसतील तर चंद्रावर जा असा टोला बी. गोपाळकृष्णन यांनी चित्रपटनिर्माते अदूर यांना लगावला होता. यावर बी. गोपाळकृष्णन यांनी सुचवलेली कल्पना चांगली आहे. जर ते माझ्यासाठी च्रंद्रावर एखादी खोली आणि एक तिकीट खरेदी करुन देऊ शकत असतील तर छान होईल, असे प्रत्युत्तर अदूर यांनी दिले आहे.
"‘जय श्रीराम’च्या घोषणा सहन होत नसतील तर चंद्रावर जा" या टीकेला अदूर यांनी दिले असे उत्तर
‘जय श्रीराम’च्या घोषणा सहन होत नसतील तर चंद्रावर जा असा टोला बी. गोपाळकृष्णन यांनी चित्रपटनिर्माते अदूर यांना लगावला होता.यावर बी. गोपाळकृष्णन यांनी सुचवलेली कल्पना चांगली आहे. जर ते माझ्यासाठी च्रंद्रावर एखादी खोली आणि एक तिकीट खरेदी करुन देऊ शकत असतील तर छान होईल, असे प्रत्युत्तर अदूर यांनी दिले आहे.
'मी पत्राच्या माध्यमातून उठवलेला आवाज हा श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात नाही तर त्या घटनांविरोधात आहे जिथे मारहाणीत एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते', असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटनिर्माते अदुर यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मान्यवरांनी पत्र पाठवले होते. त्यामध्ये अदूर यांचा समावेश आहे
.
अदूर गोपालकृष्णन यांनी धर्माच्या नावावर हिंसा पसरवणाऱ्यांवर पत्राच्या माध्यमातून टीका केली होती. यावर 'अदूर हे एक उत्तम निर्माते आहेत. मात्र त्यांना देशाच्या संस्कृतीचा अपमान करण्याचा हक्क नाही. जर त्यांन जय श्रीराम च्या घोषणा ऐकण्याची इच्छा नसेल तर त्यांनी स्वत:चे नाव श्रीहरीकोट्टामध्ये नोंदवून चंद्रावर जावे’, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते बी. गोपाळकृष्णन यांनी केली होती.