नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्येही त्याचे झपाट्याने संक्रमण होत आहे. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारी म्हणून केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर केले आहे.
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना साथीच्या आजाराला आळा घालण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेही मदत करत आहे. रेल्वेने जुन्या प्रवासी गाड्यांचे कोरोनाबाधित रुग्णांसाठी किंवा कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्षात रुपांतर करत आहे. रेल्वेमध्ये औषधे आणि खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली गेली आहे. स्लीपर कोचमधील मधला बर्थ तसेच साईडचे बर्थ काढून टाकण्यात आले आहेत.