महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयएनएक्स प्रकरणी सीबीआयचा देशाबाहेरही तपास..

सीबीआयने २०१७ मध्ये आयएनएक्स मीडिया कंपनीच्या परदेशी गुंतवणुकीतील अनियमितता पाहून, त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. २००७ साली, यात ३०५ करोड रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंजूरी दिली होती.

By

Published : Aug 23, 2019, 11:39 PM IST

आयएनएक्स प्रकरण

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया केस संदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी, सीबीआयने पाच देशांशी संपर्क साधला आहे. कंपनीशी झालेल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी सीबीआयने हे पाऊल उचलले आहे. या पाच देशांमध्ये युनायटेड किंगडम, मॉरिशस, बर्म्युडा, स्वीत्झलँड आणि सिंगापूरचा समावेश आहे.

सीबीआयने २०१७ मध्ये आयएनएक्स मीडिया कंपनीच्या परदेशी गुंतवणुकीतील अनियमितता पाहून, त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. २००७ साली, यात ३०५ करोड रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंजूरी दिली होती.

चिदंबरम यांची सध्या ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, एका विशेष न्यायालयाने गुरुवारी पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या अटकेत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत, चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details