नवी दिल्ली - मागील २४ तासांत देशभरात १ हजार ८२३ रुग्ण आढळून आले आहेत, तर ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३३ हजार ६१० झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
COVID-19: मागील २४ तासात देशभरात १ हजार ८२३ रुग्ण; एकूण कोरोनाबाधित ३३ हजार ६१०
दिलासादायक बाब म्हणजे ८ हजार ३७२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे ८ हजार ३७२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ हजार ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी २४ हजार १६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातली रुग्णांची संख्या दर ११ दिवसांनी दुप्पट होत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एकूण मृतांपैकी ७८ जणांना एकापेक्षा जास्त आजार असल्याचे माहितीत पुढे आले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर आता २५.१९ टक्के आहे. प्रमाणित नियमावलीनुसार नागरिकांची RTP-CR चाचणीच करण्यात येत असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.