नवी दिल्ली- भारताची गुप्तचर संघटना आयबीने मालदीवचे माजी उप-राष्ट्रपती अहमद अदीब यांना ताब्यात घेतले आहे. अवैधरित्या भारतात प्रवेश करत असल्याचा अदीब यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तुतीकोरिन येथे ही घटना घडली आहे.
अवैधरित्या भारतात प्रवेश करणाऱ्या मालदीवच्या माजी उप-राष्ट्रपतींना अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
तुतीकोरिन येथील बंदरावर भारतात प्रवेश करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
माजी उप-राष्ट्रपती
मालदीवचे माजी उप-राष्ट्रपती अहमद अदीब अवैधरित्या भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचले होते. तुतीकोरिन येथील बंदरावर भारतात प्रवेश करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी माहिती देताना सांगितले आहे, की आम्ही घटनेचा तपास करत असून सत्यतेची पडताळणी करत आहोत. आम्ही मालदीव सरकारसोबत चर्चा करत असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.