हवाई दलाची क्षमता वाढणार; रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदीसाठी रशियाशी २०० कोटींचा करार
१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारने तिन्ही सैन्य दलांना आपत्कालीन अधिकार दिले होते. यानुसार, तिन्ही सैन्य दले गरजेनुसार ३०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ प्रभावाने खरेदी करु शकतात. भारताने या करारासाठी याच नियमांचा वापर केला आहे.
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भारताने रशियासोबत आणखी एक महत्वाचा करार केला आहे. भारत आता रशियाकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची खरेदी करणार आहे. यासाठी भारताने रशियासोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-३५ या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत.
१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारने तिन्ही सैन्य दलांना आपत्कालीन अधिकार दिले होते. यानुसार, तिन्ही सैन्य दले गरजेनुसार ३०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ प्रभावाने खरेदी करु शकतात. भारताने याच आपत्कालीन नियमांचा वापर करुन रशियासोबत स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा करार केला आहे.