नवी दिल्ली - आज जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच ‘ग्लोबल हंगर इंडेक्स' (जीएचआय) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर आहे. तर गेल्या वर्षी 2019 मध्ये भारत 117 देशांच्या यादीत 102 क्रमांकावर होता. जागतिक भूक निर्देशांकानुसार इंडोनेशिया, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश हे भारताच्या तुलनेत चांगल्या स्थानी आहेत. इंडोनेशिया 70, नेपाळ 73, बांगलादेश 75 आणि पाकिस्तान 88व्या स्थानावर आहे. अहवालानुसार भारताची 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.
2014 मध्ये 76 देशाच्या यादीत भारत 55 स्थानावर होता. तर 2017 मध्ये 119 देशाच्या यादीत 100 वा क्रमांक आला होता. तसेच 2018 मध्ये 119 देशाच्या सूचित 103 स्थानावर होता. त्यानंतर 2019 मध्ये 117 देशांच्या यादीत 102 क्रमांकावर होता.