महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन लष्कराचा अरुणाचल सीमेवर पुन्हा वाद

मागील वर्षी सिक्कीममधील दोकलाम येथे देखील असाच वाद झाला होता. यावेळी कित्येक दक्षिण आशियाई देश भारताच्या बाजूने उभे होते.

By

Published : Jul 23, 2019, 11:34 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:26 PM IST

india-china-armies-face-off-in-arunachal-pradesh

तेझपूर - अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवर भारत आणि चीनच्या लष्करामध्ये पुन्हा वाद झाला आहे. अरुणाचलमधील सोको गावातील धबधब्याजवळ दोन्ही देशांमधील सैनिकांमध्ये वाद झाला. यामध्ये भारतीय सैनिकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे चीनी सैनिकांना देता आली नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मागील वर्षी सिक्कीममधील डोकलाम येथे देखील असाच वाद झाला होता. ७५ दिवस चाललेल्या या वादावर दोन्ही बाजूंनी सामंजस्याने सीमेवरील सैनिकांच्या तुकड्या मागे हटवून पडदा टाकण्यात आला होता. यावेळी कित्येक दक्षिण आशियाई देश भारताच्या बाजूने उभे होते. भारत-चीन सीमा ही ३,४८८ किलोमीटर लांब पसरली आहे. जम्मू ते अरुणाचल अशी ही सीमा आहे.

Last Updated : Jul 23, 2019, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details