महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2019, 7:46 PM IST

ETV Bharat / bharat

'इम्रान खान यांना पंतप्रधानपद सांभाळता येत नाही'

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असा दावा केला होता, की त्यांच्या एका इशाऱ्यावर एलओसी (सीमा) ओलांडण्यासाठी लोक तयार आहेत. त्यावर प्रत्युत्तर देत रवीश कुमार यांनी म्हटले, की 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भडकवणारे वक्तव्य केल्याची ही पहिली वेळ नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आंतरराष्ट्रीय संबंध कसे चालतात हे नक्कीच त्यांना समजत नाही. त्यांच्या वक्तव्यावरून असे दिसते, की ते पंतप्रधान पदासाठी अयोग्य आहेत.'

EMI Spokesperson Raveesh Kumar

नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मुत्सद्दीपणा समजत नसून, त्यांना हे पद सांभाळता येत नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज अशी टीका केली.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असा दावा केला होता, की त्यांच्या एका इशाऱ्यावर एलओसी (सीमा) ओलांडण्यासाठी लोक तयार आहेत. त्यावर प्रत्युत्तर देत रवीश कुमार यांनी म्हटले, की 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भडकवणारे वक्तव्य केल्याची ही पहिली वेळ नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आंतरराष्ट्रीय संबंध कसे चालतात हे नक्कीच त्यांना समजत नाही. त्यांच्या वक्तव्यावरून असे दिसते, की ते पंतप्रधान पदासाठी अयोग्य आहेत. 'कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान भारतावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. वेगवेळ्या ठिकाणच्या व्यासपीठांवरून पाकिस्तानी नेते भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत. या सर्व प्रकारानंतर कुमार यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. यासोबतच, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहित हाफिज सईदला बँक खाते वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. याबाबात बोलताना, एका दहशतवाद्याला मदत करण्यासाठी एखादा देश कसेकाय पत्र लिहू शकतो? असा सवाल रवीश कुमार यांनी केला. दहशतवादाशी आम्ही लढत आहोत असे एका बाजूला म्हणणारा पाकिस्तान दुसरीकडे असे करून स्वतःचा दुटप्पीपणा उघड करत आहे, असेही कुमार यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details