हैदराबाद -हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. भाजपने तब्बल 48 जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. दुसरीकडे भाजपच्या विजयाचा फटका एमआयएमला बसल्याने, पक्षाला केवळ 44 जागांवरच समाधान मानावे लागले. निकालानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
हैदराबाद महापालिका निवडणुकीवरून ओवेसींचा भाजपवर निशाणा
हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. भाजपने तब्बल 48 जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. दुसरीकडे भाजपच्या विजयाचा फटका एमआयएमला बसल्याने, पक्षाला केवळ 44 जागांवरच समाधान मानावे लागले. निकालानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
असदुद्दीन ओवेसी
भाजपचे वादळ थोपवण्यात एमआयएमला अपयश आले का? असा प्रश्न ओवेसी यांना पत्रकारांनी विचारताच, त्यांनी भाजपचे हे वादळ वगैर काही नव्हते, तसे असते तर भाजपचा महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पराभव झाला नसता असे म्हटले. तसेच आम्ही जनमताचा आदर करतो, थोड्याच दिवसांमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवून निवडणुकीमध्ये आम्ही कुठे कमी पडलो याचा आढावा घेतला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.