कर्नाटक - देशात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासूनच्या बचाावासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात कमी भासत आहे. अशात कर्नाटकातील हुबळी शहरातील काही तरुण स्वयसेवकांच्या एका गटाने पुढाकार घेतला आहे. हे तरुण कोरोना विरुद्धची लढाई लढणाऱ्यांसाठी फेस शिल्ड मास्कची निर्मिती करत आहेत.
कोरोनाच्या लढाईत तरुणांचा हातभार, फेस शिल्ड मास्कची निर्मिती
बसवराजा होन्नाल्ली यांच्या नेतृत्वात ही टीम काम करत आहे. पुढील काही दिवसात 500 फेस शिल्ड मास्क बनवण्याचे या तरुणांचे उद्दीष्ट आहे. हे मास्क जिल्ह्यातील पोलिसांना, नागरिकांना तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या लढाईत तरुणांचा हातभार
बसवराजा होन्नाल्ली यांच्या नेतृत्वात ही टीम काम करत आहे. पुढील काही दिवसात 500 फेस शिल्ड मास्क बनवण्याचे या तरुणांचे उद्दीष्ट आहे. हे मास्क जिल्ह्यातील पोलिसांना, नागरिकांना तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
प्लास्टिक शीट आणि इलॅस्टीक बँडच्या सहाय्याने हे मास्क बनवले जात आहेत. या स्वयंसेवकांनी यापूर्वीही 500 फेस शिल्ड मास्क तयार केले होते. या मास्कचे त्यांनी कोरोनाच्या लढाईत सहभागी कर्मचाऱ्यांना वाटप केले होते.
Last Updated : Apr 21, 2020, 1:27 PM IST