महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आशियाई चित्ता होता भारताची ओळख, त्याची जागा आफ्रिकन चित्ता घेणार का?

भारतातील चित्त्याची आशियाई चित्ता म्हणून ओळख आहे. याचे बंध भारतीय संस्कृतीशीही जोडले गेलेले प्राचीन गुंफाचित्रांतून पहायला मिळतात. १९५२ मध्ये आशियाई चित्ता भारतून नामशेष झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर झाले. अनेक दशके ऊहापोह झाल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकन चित्त्याला भारतात आणण्यास मंजुरी दिली आहे.

By

Published : Feb 9, 2020, 4:02 PM IST

चित्ता
चित्ता

भारतातील चित्त्याची आशियाई चित्ता म्हणून ओळख आहे. याचे बंध भारतीय संस्कृतीशीही जोडले गेलेले प्राचीन गुंफाचित्रांतून पहायला मिळतात. १९५२ मध्ये आशियाई चित्ता भारतून नामशेष झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर झाले. अनेक दशके ऊहापोह झाल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकन चित्त्याला भारतात आणण्यास मंजुरी दिली आहे. आफ्रिका खंडातील नामिबीया या देशातून हे चित्ते आणण्यात येणार आहेत.

इतिहास

⦁ चित्ता हा हा शब्द संस्कृतमधील चित्रक (ठिपके असलेला) या शब्दापासून तयार झाला.

⦁ आशियात चित्ता असल्याचे इसवीसनपूर्व २५०० ते २३०० काळातील दृश्य पुरावे आजही उपलब्ध आहेत. दक्षिणेत खारवाई, खैरताबाद आणि मध्य प्रदेशात चंबळ खोऱ्यात ही गुंफाचित्रे आढळतात. १९३५ मध्ये जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री हिस्ट्री सोसायटीने प्रकाशित केलेल्या एका परिशिष्टामध्ये येथे पूर्वापार काळापासून चित्ता अस्तित्वात असल्याचे दिले आहे. हे चित्ते बंगालपासून संयुक्त प्रांत, पंजाब आणि राजपुताना, मध्य भारत आणि दक्षिणेपर्यंत फिरले असल्याचे नमूद केले आहे.

⦁ मुघलांनी चित्त्याचा वापर शिकारीसाठी केला. त्यांनीच त्याला 'चीताह' हे नाव दिले.

⦁ १९४७ मध्ये भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होत असताना आताच्या काळात छत्तीसगड म्हणवल्या जाणाऱ्या राज्यातील डोंगराळ भागातील एका राजाने भारतातील शेवटचे तीन चित्ते मारल्याचे सांगितले जाते.

⦁ मार्जार प्रजातील या प्राण्यांनी भारतीय उपखंडात हजारो नसले तरी शेकड़ो वर्षे निश्चितपणे वास्तव्य केले आहे. ते भारतीय संस्कृतीचाही भाग झाले होते. १६ व्या आणि १७ व्या शतकात मुघल बादशाह अकबराने तब्बल १ हजार चित्ते केवळ शिकारीसाठी पाळले होते. त्यांच्या मदतीने शिकारीचे अनेक बेत यशस्वीपणे राबवण्यात आले. २० शतकाच्या सुरुवातीला त्यांची संख्या कमी झाली होती आणि १९५२ ला ते या उपखंडातून नामशेष झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नामशेष झालेले हे एकमेव मोठ्या आकाराचे सस्तन प्राणी आहेत, असे मानले जाते.

⦁ चित्ते परत आणण्यासाठी भारत सरकारने अनेक दशके प्रयत्न केले. सुरुवातीला संवर्धकांनी या आशियातील चित्त्यांना इतर ठिकाणाहून आणण्याची किंवा त्यांचे क्लोनिंग करण्याची कल्पना मांडली. या चित्त्यांच्या भारतात सापडणाऱ्या पोटजातींच्या माध्यमातून हे करण्याची ही कल्पना होती. मात्र, हे सर्व पर्याय निरुपयोगी ठरल्यानंतर त्यांनी आशियाई चित्त्याशी मिळत्याजुळत्या आफ्रिकन प्रजातीच्या चित्त्यांकडे आपले लक्ष वळविले.

⦁ आशियाई आणि आफ्रिकन या दोन्ही प्रजातींचे चित्ते तुकतुकीत आणि वाळूच्या रंगाचे असून त्यावर काळे ठिपके आहेत. तसेच, त्यांच्या डोळ्यापासून खाली निघणारी अश्रूंच्या धारेसारखी दिसणारी रेषही सारखीच आहे. तथापि, आशियाई चित्ते थोडेसे लहान आकाराचे आणि आफ्रिकन चित्त्यांच्या तुलनेत फिक्या रंगाचे होते. परंतु, ही अगदी लहानशी भिन्नता असल्याने 'मूळ प्रजातीची व्याख्या कशी केली आणि एक उपजाती दुसऱ्यासाठी कशी बदलली जाऊ शकते' याविषयीचा मूलभूत प्रश्न झाकोळला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये, चित्त्याच्या अनुवंशशास्त्राविषयी अगदी बारकाईने वैज्ञानिक वादविवाद झाला असून तो कायदेशीरीत्या आयात करण्याचा मार्गातील प्रश्न बनला. त्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचला.

⦁ २०१२ मध्ये न्यायालयाकडून भारताच्या मूळ सिंहांच्या संरक्षणाबद्दल सुनावणी होत असताना, आफ्रिकन चित्त्यांना भारतात आणण्याच्या सरकारच्या योजनेबद्दलही चर्चा पुढे आली. भारतीय वन्यजीव संरक्षण सोसायटीचे माजी संचालक आणि या प्रकरणातील तज्ज्ञ साक्षीदार रवी चेल्लम यांनी युक्तिवाद केला की, सध्याच्या प्रजातींचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी भारताने आपल्या मर्यादित संवर्धनाची साधने खर्च करावीत. 'आपण आत्ता आफ्रिकन प्रजातींच्या संवर्धनासाठी गुंतवणूक करायला हवी का?' असे त्यांनी विचारले. 'आताच्या घडीला हा आपला प्राधान्यक्रम आहे का?' असेही ते म्हणाले.

⦁ २०१३ मध्ये न्यायालयाने 'आफ्रिकन चित्ता ही परदेशी प्रजाती असून ती भारतात अस्तित्त्वात नव्हती आणि यामुळे कायदेशीररीत्या ती आपल्या देशाची ओळख बनू शकत नाही,' असा निकाल दिला होता. मात्र, आता भारत सरकारच्या विनंतीमुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशाचे पुनरावलोकन करत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे चित्त्याला भारतात परत येण्याची नवी संधी मिळाली आहे.

⦁ भारतीय सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये चित्त्यांना भारतात पुन्हा आणण्याची योजना अनियंत्रित आणि बेकायदेशीर असल्याचे सांगत हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र, आता आफ्रिकेतील नामिबीया येथून चित्ते भारतात पुन्हा आणण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे जवळपास ७० वर्षे भारतातून लुप्त झालेल्या चित्त्यांचा परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details