महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्यात जोरदार वादळी पाऊस, अनेक ठिकाणी पडझड

जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे गोव्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

By

Published : Jun 27, 2019, 12:03 AM IST

गोव्यात जोरदार वादळी पाऊस

पणजी - जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे गोव्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

तब्बल २ आठवडे उशिरा दाखल होऊन मान्सून म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही, असे वाटत असतानाच बुधवारी सकाळपासून हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली तर काही संरक्षक भिंत कोसळल्या. गटारे तुंबून रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता.

गोव्यात जोरदार वादळी पाऊस

पणजी अग्निशमाक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी पणजीतील इमेक्यूलेट चर्च परिसरात एका उभ्या असलेल्या महागड्या गाडीवर संरक्षक भिंत कोसळून सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. काही ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर मळा येथे एक झाड घरावर कोसळले.

पहिल्याच पावसात राजधानी पणजीतील अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबर उखडून खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. तसेच रस्त्यावर खडी पसरली होती. पावसाळा सुरू होताना रस्त्यांची ही अवस्था असेल तर पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details