महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसामसह हरियाणा, त्रिपुरा, हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; काही ठिकाणी पूरस्थिती

देशात अनेक राज्यांमध्ये मान्सून धुवाँधार बरसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. तर, काही ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पूरस्थिती

By

Published : Jul 15, 2019, 3:47 PM IST

Updated : Jul 15, 2019, 4:31 PM IST

नवी दिल्ली - देशात अनेक राज्यांमध्ये मान्सून धुवाँधार बरसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. तर, काही ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
त्रिपुरा
येथील आगरतळा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक थांबली आहे. जनजीवन विस्कळित झाले आहे.
हरियाणा
अंबाला येथील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. येथे जोरदार पाऊस सुरू आहे.
आसाम
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गुवाहाटीमध्ये उमानंद मंदिराकडे घेऊन जाणाऱ्या फेरी बोटींची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच, काझीरंगा नॅशनल पार्कच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी जमले आहे. प्राण्यांना उंच टेकड्यांवर नेण्यात आले आहे. मोरीगाव जिल्ह्यातील २०० गावांना जोरदार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे.
हिमाचल प्रदेश
राष्ट्रीय महामार्ग ३०५ पुराच्या पाण्यामुळे २ तासांसाठी बंद करण्यात आला आहे. येथे धमण येथील औत-लुहरी रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र
ठाण्यातील बंगारवाडी परिसरात पुराचे पाणी साचले आहे. मुले शाळेत जाण्यासाठी पुराचे पाणी आलेला रस्ता पार करावा लागत आहे.

Last Updated : Jul 15, 2019, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details