महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: गृहमंत्रालयाच्या याचिकेवर २३ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दोषींनी सतत कायदेशीर पळवाटांचा वापर केल्याने डेथ वॉरंट रद्द झाले आहेत. आता चौथ्यांदा डेथ वॉरंट काढण्यात आला आहे. दिलेल्या तारखेला फाशी मिळावी अशी आशा निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.

nirbhaya case
सर्वोच्च न्यायालय

By

Published : Mar 5, 2020, 6:55 PM IST

Updated : Mar 5, 2020, 7:55 PM IST

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २३ मार्चला सुनावणी होणार आहे. चार दोषींना वेगवेगळ्या दिवशी फाशी देण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्रालयाने याचिकेत केली आहे. त्यावर निर्णय दिला जाणार आहे.

हेही वाचा -निर्भया प्रकरण : 20 मार्चला दोषींना फासावर लटकवणार ! नव्याने डेथ वॉरंट जारी

सर्व दोषींना २० मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे, असे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाला सांगितले. दोषींनी सर्व कायदेशीर पर्याय वापरले असून कायदेशीर प्रक्रियेचे हसे केल्याचेही मेहता म्हणाले.

हेही वाचा -दिल्ली हिंसाचारातील शाहरुखचा थाट..! ४ गर्लफ्रेंड.. शाही पार्ट्या अन् जिमचे फॅड

आज पटियाला हाऊस न्यायालयाने दोषींना फाशी देण्याबाबत चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केला आहे. २० मार्चला सकाळी ५.३० ला सर्वांना फाशी देण्यात येणार आहे. याआधी तीन डेथ वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, दोषींनी सतत कायदेशीर पळवाटांचा वापर केल्याने डेथ वॉरंट रद्द झाले आहेत. आता चौथ्यांदा डेथ वॉरंट काढण्यात आला आहे. दिलेल्या तारखेला फाशी मिळावी, अशी आशा निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.

Last Updated : Mar 5, 2020, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details