नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या अनेक ग्राहकांना कालपासून बँकेचे नेटवर्ट डाऊन असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागl आहे. तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना इंटरेनट आणि मोबाईल बँकींग अॅपच्या सेवेपासून दुर रहावे लागत आहे. बँकेचे नेटवर्क डाऊन असल्यामुळे अनेकांना ऑनलाईन बँकिंग सेवेअभावी नुकसान होत आहे, तसेच अकाऊंट लॉगइन करण्यात अडचणी येत आहेत.
एचडीएफसीची नेट बँकिग, मोबाईल अॅप सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद.. ग्राहकांना मनस्ताप
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या अनेक ग्राहकांना कालपासून बँकेचे नेटवर्ट डाऊन असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागl आहे. तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना इंटरेनट आणि मोबाईल बँकींग अॅपच्या सेवेपासून दुर रहावे लागले.
नेटवर्क डाऊन झाल्यानंतर तत्काळ बँकेने ट्विटरवर उत्तर दिले. फक्त काही ग्राहकांना लॉगइन अडचण येत असून काळजी करण्याची गरज नाही. आमचे तंत्रज्ञ तांत्रिक अ़डचण सोडवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत. काही अवधीतच आम्ही सेवा पुर्ववत करु, असे ट्विटही बँकेकडून करण्यात आले होते. मात्र, तरही नागरिकांना ऑनलाईन सुविधा वापरण्यास अडचणी येत आहेत. बँकेच्या असुविधेचा आज(मंगळवार) दुसरा दिवस असून ग्राहकांची असुविधा होत आहे.
ग्राहकांना होत असलेल्या असुविधेवरुन बँकेने क्षमा मागीतली आहे. तसेच काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असे ट्विटरवरुन स्पष्ट केले. ऑनलाईन बँकीग सेवा बंद असल्यामुळे ग्राहकांनी ट्विटरवरून एचडीएफसीच्या अकांऊटवर तक्रारी केल्या आहेत. नियोजित व्यवहार करणे शक्य नसल्यामुळे काही ग्राहाकंनी संताप व्यक्त केला. तर दिवसभर सेवा बंद असल्यावरुन तत्काळ सुविधा पुर्वतत करण्याची मागणी बँकेकडे केली.