नवी दिल्ली - गुजरातमधील सामूहिक बलात्कारातील पीडित बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयाचे बुधवारी आभार मानले. न्यायालयाने त्यांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषेदत न्यायालयाचे आभार मानले. मागील १७ वर्षांचा कालखंड अत्यंत वेदनादायी होता, असे त्या म्हणाल्या.
गुजरात सामूहिक बलात्कार पीडित बिल्किस बानोने मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार
न्यायालयाने त्यांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषेदत न्यायालयाचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बानो यांना शासकीय नोकरी आणि राहण्या-जेवणाचा खर्चही नियमानुसार देण्याचे निर्देश दिले आहेत.
२३ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला बानो यांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. बिल्कीस बानो यांना राज्य सरकारने ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली होती. मात्र, बानो यांनी ती नाकारली होती.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बानो यांना शासकीय नोकरी आणि राहण्या-जेवणाचा खर्चही नियमानुसार देण्याचे निर्देश दिले आहेत. मार्च २००२ मध्ये बानो यांच्यावर गुजरात दंगलीदरम्यान सामूहिक बलात्कार झाला होता. त्यांच्या ३ वर्षांच्या मुलीसह त्यांच्या कुटुंबातील १४ जणांना मरणासन्न अवस्थेत सोडण्यात आले होते. शिवाय, जेव्हा त्यांच्यावर बडोद्यात हा हल्ला झाला, त्या वेळेस त्या ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या.