महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, 'आरडी' धारकांना सरकारकडून दिलासा..

पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 2019-20 ची अनिर्वाय रक्कम भरण्याची मुदत आता 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

By

Published : Apr 12, 2020, 2:02 PM IST

पीपीएफ
पीपीएफ

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेला लॉकडाऊन याचा विचार करता सरकारने सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, आवर्ती जमा (आरडी) धारकांना दिलासा दिला आहे. या योजनांसाठी भराव्या लागणाऱ्या रक्कमेचा कालावधी तीन महिने वाढवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली.

पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 2019-20 ची अनिर्वाय रक्कम भरण्याची मुदत आता 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या योजनेतील खात्यांना सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम खात्यामध्ये जमा करावी लागते. मर्यादित वेळेच्या पुढे भरणा केल्यास विलंब शुल्क द्यावा लागतो. सामान्यत: योजना धारक वर्षाच्या शेवटी ही रक्कम भरत असतात कारण प्राप्तिकर नियम ८० द्वारे त्यांना सूट मिळते.

कोरोना विषाणूची सध्याची स्थिती पाहता छोट्या बचत ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सूट देण्यात आली असल्याचे वित्त मंत्रालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details