मुंबई - गडचिरोलीत माओवाद्यांनी शीघ्र कृती दल जवानांच्या २ वाहनांवर बॉम्ब हल्ला केला. या आयईडी स्फोटात १५ जवान आणि वाहन चालक अशा एकूण १६ जणांना वीरमरण आले. दोन्ही वाहनांमध्ये २५ जवान होते. महाराष्ट्र दिनीच हा हल्ला झाल्यामुळे पोलीस विभागावर शोककळा पसरली. वर्ष २०१० ते २०१९ या कालावधीत माओवाद्यांनी राज्यात ३६४ हत्या घडवून आणल्याचे नोंद झाले आहे.
हल्ल्याच्या एकूण १८१ घटना घडल्या असून यात १४३ नागरिक, ६६ सुरक्षा दलांचे जवान मिळून ३६४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, पोलिसांना एकूण १५५ दहशतवादी, कट्टरवादी आणि घुसखोरांना मारण्यात यश आले आहे.
वर्ष | हल्ल्याच्या घटना | नागरिक | सुरक्षा दलांचे जवान | माओवादी | एकूण |
23 | 26 | 15 | 3 | 44 | |
32 | 36 | 10 | 21 | 67 | |
22 | 21 | 13 | 5 | 39 | |
16 | 10 | 7 | 27 | 44 | |
16 | 9 | 11 | 10 | 30 | |