नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020' च्या अंतिम फेरी सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या सोहळ्यात 21 व्या शतकातल्या युवकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले, असे मोदी म्हणाले. तसेच देशाच्या देशाचे नवीन शैक्षणिक धोरणावर त्यांनी भाष्य केले. बिहार-आसाममधील पूर परिस्थिती लक्षात घेता, पूर नियंत्रणासाठी एखादे तंत्र विकसित केले तर ते एक मोठे यश असेल, असेही मोदी म्हणाले.
परिवर्तनात्मक सुधारणा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट, रोजगार मिळवणारे निर्माण करण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे घडवण्यावर भर द्यावा. सन 2035 पर्यंत देशात उच्च शिक्षणासाठी एकूण पटनोंदणीच्या प्रमाणामध्ये 50 टक्के वाढ व्हावी, असे धोरणाचे ध्येय निश्चित करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्यासाठी कार्य करणाऱ्या एका मुलीशी संवाद साधला. सरकार जन औषधी केंद्रांमध्ये 1 रुपयात महिलांच्या आरोग्यासाठी उपलब्ध करत आहे. तुम्ही तयार करत असलेले सेंद्रिय बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स हे महिलांसाठी मदतपूर्ण ठरतील, असे मोदी तीला म्हणाले. तसेत त्यांनी विचारपूर्ण कार्य केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले.