नवी दिल्ली - हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पुर्वीच काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. हरियाणा काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष अशोक तंवर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला आहे.
अशोक तंवर यांनी पक्षावर ५ कोटीमध्ये तिकिट विकल्याचा आरोप केला आहे. यापुर्वी अशोक यांनी सोनिया गांधी यांना आपल्याला जबाबदारीपासून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. आपल्या टि्वटरच्या अधिकृत खात्यावरून त्यांनी यासंबधी माहिती दिली आहे.
हेही वाचा -इस्रोकडून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे प्रसिद्ध
हरियाणामध्ये ९० विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्य महत्त्वाची टक्कर पाहायला मिळणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा -पंतप्रधान शेख हसिना भारत दौऱ्यावर; भारत-बांग्लादेशादरम्यान ६ ते ७ करारांवर सह्या