नवी दिल्ली - काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्योतिरादित्य सिंधिया आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत सिंधिया प्रवेश करणार आहेत. काल (मंगळवारी) सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशात सत्तापेच निर्माण झाला आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया आज करणार भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्योतिरादित्य सिंधिया आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थिती सिंधिया भाजपप्रवेश करणार आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया
सिंधिया यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, बहुमत सिद्ध करु, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसने सर्व आमदार सुरक्षिततेसाठी राजस्थानातील जयपूर शहरात हलविले आहेत. तेथील ब्यूना व्हिस्टा रिसॉर्टमध्ये ते थांबणार आहेत. दरम्यान भाजपने आपल्या १०६ आमदारांना हरियाणामध्ये नेले आहे.
Last Updated : Mar 11, 2020, 12:54 PM IST