शिमला- लॉकडाऊनमध्ये माणुसकीच्या नात्याने अनेक लोक एकमेकांना मदत करत आहेत. त्याचवेळी काही कोरोना वॉरिअर्स जनावरांसह, पशू पक्ष्यांनाही मदत करताना दिसत आहेत. सफाई कर्मचारी असलेल्या दीपक कुमार यांनीही पशू पक्ष्यांची देखभाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
भूतदया! भटक्या जनावरांच्या उपचार आणि चाऱ्यासाठी 'त्या' अवलियाने काढले ७५ हजारांचे कर्ज गेल्या अनेक वर्षांपासून दीपक परिसरातील पशू पक्ष्यांचा सांभाळ करत आहेत. त्यांच्यावर उपचार करतात. जनावरांच्या चाऱ्यासाठी दीपक प्रयत्न करत आहेत.
कर्ज काढून आहाराची व्यवस्था -
ग्रामीण भागातील लोक आजुबाजूच्या परिसरातील जखमी पशू आणि जनावरांविषयी मला माहिती देतात. आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचून त्यांच्यावर उपचार करतो, असे दीपक यांनी सांगितले. आतापर्यंत १५०० जखमी जनावरांवर उपचार केला आहे. संचारबंदीमध्ये पैशांची अडचण आली म्हणून जनावरांच्या चाऱ्यासाठी ७५ हजार रुपयांचे कर्ज काढले असल्याचेही दीपक यांनी सांगितले.