महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एकाच राज्यात पाच उपमुख्यमंत्री..! देशाच्या इतिहासात 'या' राज्यात पहिल्यांदाच घडतोय असा प्रकार

मागासवर्गीयांना प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशाने या मुख्यमंत्र्यानी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

एकाच राज्याचे ५ उपमुख्यमंत्री

By

Published : Jun 7, 2019, 1:53 PM IST

Updated : Jun 7, 2019, 3:09 PM IST

अमरावती - आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या मंत्रिमंडळात पाच जणांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच, असा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीयांना प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशाने जगन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी २५ जणांचे मंत्रीमंडळ स्थापन केले आहे. त्यात ५ जणांना उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यासंबंधीची घोषणा खुद्द जगन मोहन रेड्डी यांनी आज सकाळी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. या नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी शनिवारी आयोजीत करण्यात आला आहे.

मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व -

उपमुख्यमंत्रीपदी निवडलेले सर्व सदस्य हे अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक तसेच स्थानिक कापू समाजातील असतील, असे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी सांगितले. मागील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकरामध्येही दोन उपमुख्यमंत्री होते. त्यापैकी मागास वर्ग आणि कापू समुदायातील एका व्यक्तीला प्रतिनिधित्व देण्यात आले होते.

नुकत्याच पार पडलेल्या आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला आहे. माजी मख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला केवळ २४ जागा जिंकता आल्या. शिवाय लोकसभेच्याही २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसला यश मिळाले आहे.

देशाच्या इतिहासात 'या' राज्यात पहिल्यांदाच घडतोय असा प्रकार

दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांच्या निर्णयाचा आम्हाला खूप आनंद झाला असून त्यांच्या या निर्णयामुळे अनुसुचीत जाती- जमाती आणि अल्पसंख्याकांना न्याय मिळाला आहे. जगन मोहन रेड्डी हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया वायएसआर कांग्रेसचे आमदार एम. एम. शेख यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 7, 2019, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details