महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशात कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग, 10 रुग्णांचा मृत्यू

आंध्रच्या विजयवाडा येथील हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 30 जणांना वाचविण्यात आले आहे.

By

Published : Aug 9, 2020, 8:54 AM IST

Updated : Aug 9, 2020, 3:20 PM IST

विजयवाडा
विजयवाडा

विजयवाडा - रविवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी 5 वाजता ही आग लागली होती. आगीमुळे तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 30 जणांना वाचवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या हॉटेलचा वापर करण्यात येत होता. येथे 22 रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या. अग्निशामक दलाकडून कर्मचाऱ्यांसह हॉटलेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. बचावकर्मींनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सबंधित अधिकाऱ्यांना बचाव उपाययोजना कराव्यात आणि जवळच्या रूग्णालयात जखमींना दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एका रुग्णालयात आग लागून ८ रुग्णाचा मृत्यू झाला होता.

Last Updated : Aug 9, 2020, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details