महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फतेहाबादमध्ये विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवून माध्यमांप्रती व्यक्त केली आपुलकी

टोहाना येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोनासंदर्भात एक बातमीपत्र सांगितले. पत्रकारिता क्षेत्रातील लोकांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. मुलांनी घरी राहून हे सर्व तयार केले.

students video gratitude media person
फतेहाबादमध्ये विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवून माध्यमांप्रती व्यक्त केली आपुलकी

By

Published : May 3, 2020, 2:59 PM IST

फतेहाबाद(हरियाणा) - फतेहाबादच्या टोहाना परिसरात एका खासगी शाळेत वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे निमित्याने एक व्हिडिओ तयार करून माध्यमात काम करणाऱ्या लोकांना सॅल्यूट करण्यात आले. या व्हिडिओत लहान लहान मुलांनी बातमीदारांप्रमाणे लॉकडाऊनबद्दल माहिती दिली.

या विशेष दिनी टोहाना येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोनासंदर्भात एक बातमीपत्र सांगितले. पत्रकारिता क्षेत्रातील लोकांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. मुलांनी घरी राहून हे सर्व तयार केले. मुलांच्या या प्रयत्नाचे सगळीकडे कौतूक होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

फतेहाबादमध्ये विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवून माध्यमांप्रती व्यक्त केली आपुलकी

पत्रकार या समाजाचा महत्वाचा भाग आहे, असे शाळेचे संचालक विकास बिश्नोई सांगतात. जागतिक महामारीच्या काळातदेखील माध्यमे योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. लोकांमध्ये भिती निर्माण होऊ नये, म्हणून अफवांना विराम देतात. त्यामुळे पत्रकारांच्या कामाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी त्यांना हे टास्क दिले होते, असे संचालक बिश्नोई यांनी सांगितले.

वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे साजरा करण्याचा उद्देश नागरिक आणि सरकार यांना माध्यमांप्रती जबाबदार बनविण्यासाठी प्रेरणा देणे हा असतो. यासाठी यूनेस्कों दरवर्षी एक थीम ठरवत असते. यावर्षी सेफ्टी ऑफ जर्नलिस्ट प्रेस फ्रीडम अँड मीडिया कॅप्चर ही थीम ठेवण्यात आली असून आयोजन करण्याची संधी नीरदलॅंडला मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details