बंगळुरु - संसदेत विरोधकांच्या गोंधळात रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके मंजूर झाली. याविधेयकांचा देशभरातून विरोध करण्यात येत आहे. अभ्यासक व विश्लेषक योगेद्र यादव यांनी या विधेयकांना विरोध दर्शवला असून 'हे विधेयके देशाच्या इतिहासात मैलाचा दगड नाही, तर शेतकऱ्यांच्या गळयातले लोढणे आहे, अशी टीका त्यांनी केली.
कृषी विधेयकाविरोधात कर्नाटकातील शेतकरी आंदोलन करत आहेत. फक्त महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी नाही तर, संपूर्ण देशातील शेतकरी या विधेयकाविरोधात आहेत. या विधेयकांचा शेतकऱ्यांच्या येत्या पिढ्यांवर फरक पडणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये 'कंपनी राज' होण्याची ही सुरुवात आहे. म्हणून शेतकरी याचा विरोध करत आहेत, असे ते म्हणाले.