नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता दिल्लीसह देशभरात लॉकडाऊन आणि संचारबदी करण्यात आली आहे. जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हापासून दिल्लीत असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. या हजारो नागरिकांचे दिल्ली एनसीआरमधील काही फोटोदेखील समोर येत आहेत.
या कारणामुळे पलायनाला सुरुवात -
उत्तरप्रदेशातील झांसी येथील कुटुंब दिल्लीच्या आंबेडकर नगर भागात रोज काम करुन आपला परिवार चालवतात. या कुटुंबाने सांगितले, की जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झाला आहे, तेव्हापासून काम बंद आहे. त्यामुळे, त्यांना पैसै मिळत नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे काहीही पर्याय नसल्यामुळे आम्ही पलायन करण्यास भाग पडत आहोत.
दिल्लीतील हजारो नागरिकांचे पलायन संचारबदीमुळे बस, ट्रेनसोबतच सर्व प्रवासी वाहने बंद आहेत. यामुळे, हे लोक पायीच दिल्लीच्या एमबी रस्त्यावरुन आपल्या मुलांना घेऊन घरी जाताना दिसत आहेत. यावेळी झांसीतील कुटुंबाने एक सायकलही विकत घेतली. ज्याचा उपयोग त्यांनी आपल्यासोबत असणारे साहित्य ठेवण्यासाठी केला. त्यांच्यासोबत 2 लहान मुलेदेखील होती.