नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटकाळात करदात्यांना दिलासा देणारे निर्णय जीएसटी परिषदेने आज घेतले आहेत. निरंक दायित्व असलेल्या जीएसटी परताव्यासाठी उशिर झाला तरी दंड भरावा लागणार नाही, याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. ही सवलत जुलै 2017 ते जानेवारी 2020 मध्ये नोंदणी झालेल्या संस्थांसाठी आहे..यासाठी भारत- चीन सीमावादाची अधिकृत माहिती सरकारने नागरिकांसाठी खुली करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपला केले आहे. मात्र, भाजपने राहुल गांधी यांचे एक जुने ट्विट शेअर करत टीका केली आहे. राहुल गांधी यांनी चीनी राजदुताची भेट घेतली होती, त्यासंबधीचे ट्विट केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शेअर केले आहे..यासह महत्वाच्या १० बातम्या...
- नवी दिल्ली- भारत- चीन सीमावादाची अधिकृत माहिती सरकारने नागरिकांसाठी खुली करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपला केले आहे. मात्र, भाजपने राहुल गांधी यांचे एक जुने ट्विट शेअर करत टीका केली आहे. राहुल गांधी यांनी चीनी राजदुताची भेट घेतली होती, त्यासंबधीचे ट्विट केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शेअर केले आहे.
सविस्तर वाचा -भारत- चीन सीमा वादावरून रविशंकर प्रसाद यांनी शेअर केलं राहुल गांधीचं जुनं ट्विट, म्हणाले...
- नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटकाळात करदात्यांना दिलासा देणारे निर्णय जीएसटी परिषदेने आज घेतले आहेत. निरंक दायित्व असलेल्या जीएसटी परताव्यासाठी उशिर झाला तरी दंड भरावा लागणार नाही, याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. ही सवलत जुलै 2017 ते जानेवारी 2020 मध्ये नोंदणी झालेल्या संस्थांसाठी आहे.
सविस्तर वाचा -जाणून घ्या, जीएसटी परिषदेतील 'या' महत्त्वाच्या घोषणा
- मालेगाव(नाशिक) : मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्ण धुळ्यात नको, असे वादग्रस्त विधान करणारे धुळ्याचे खासदार गुरुवारी अचानक मालेगावमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या पत्रकार परिषदेत अचानकपणे हजेरी लावली. त्यामुळे मालेगावच्या महापौर ताहेरा शेख आणि माजी आमदार रशीद शेख यांनी त्यांचा निषेध केल्याने काही काळ विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर वाचा -तुमचा निषेध म्हणत..मालेगावच्या महापौरांनी सोडली पत्रकार परिषद; खासदार भामरेंच्या अचानक आगमनाने संतप्त
- मुंबई- राज्य मंत्रिमंडळातील तिसरे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज त्यावर स्पष्टीकरण दिले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत, असे टोपे यांंनी सांगितले.
सविस्तर वाचा -धनंजय मुंडे फायटर, लवकरच बरे होतील; राजेश टोपेंचा विश्वास
- भोकरदन(जालना) : भोकरदन नगरपरिषदने शहरातील कापड दुकान, हॉटेल या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु, या सुचनांचे पालन न करणे, मास्क न लावणे, अशा नागरिकांविरुद्ध प्रशासनाने आता धडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील दोन दिवसात प्रशासनाने सुमारे 13 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सविस्तर वाचा -मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध भोकरदन पालिकेची कारवाई; दोन दिवसात 13 हजार 600 रुपयांचा दंड वसूल
- नांदेड- तीक्ष्ण हत्याराने एका तरुणाची हत्या केल्याची घटना सिडको परिसरातील महात्मा गांधी हायस्कूल परिसरात घडली. बालाजी राठोड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.