महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

By

Published : May 8, 2020, 10:39 AM IST

top ten news stories at ten AM
Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या ठळक बातम्या!

  • औरंगाबाद - शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वाचा :लॉकडाऊनची संहारकता.. औरंगाबादजवळ १६ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले, एक गंभीर

  • औरंगाबाद - जिल्ह्याच्या करमाडजवळ आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. रेल्वे रुळांवर झोपलेल्या १७ मजूरांना एका मालगाडीने चिरडले, यात १६ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा :औरंगाबाद दुर्घटना : पंतप्रधांनानी व्यक्त केले दुःख, आतापर्यंत १६ जणांचा झालाय मृत्यू..

  • मुंबई- दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी नवीन 692 रुग्णांचे नोंद झाली. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 11 हजार 219 वर पोहोचला आहे. तर मुंबईत कोरोनामुळे आज 25 जणांचा मृत्यू झाला असल्याने मृतांचा एकूण आकडा 437 वर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा :MAHA CORONA LIVE : राज्यात नवीन १ हजार २३३ कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८

  • नवी दिल्ली -भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 3 हजार 390 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 103 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

सविस्तर वाचा :देशभरात मागील 24 तासात 3 हजार 390 नवे कोरोनाबाधित, तर 103 जण दगावले

  • तिरुवअनंतपूरम - विदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाचे पहिले विमान १७७ प्रवाशांना अबुधाबीतून घेऊन आले आहे. काल(गुरुवार) रात्री १०.०९ मिनिटांनी विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

सविस्तर वाचा : वंदे भारत मिशन: युएईत अडकलेल्या नागरिकांना घेऊन एअर इंडियाची दोन विमाने केरळात दाखल

  • पालघर - जिल्ह्यातील कथित तिहेरी हत्याकांडाती कासा पोलीस ठाण्याअंतर्गत गडचिंचले भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे गडचिंचले भागात सकाळी 11 च्या सुमारास दाखल झाले. येथे त्यांनी गावातील सरपंच व इतर लोकांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. यात पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असून, त्यांच्या कारभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी बोलताना सांगितले.

सविस्तर वाचा :गृहमंत्र्यांची गडचिंचले तिहेरी हत्याकांड घटनास्थळी भेट; पोलीस अधीक्षक सिंग यांना सक्तीच्या रजेचा आदेश

  • अकोला - इच्छाशक्ती असेल तर कोरोनासारख्या संकटाच्या काळात समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न करता येतो. हे अकोल्यातील महादेवराव भगत (वय 94 वर्षे) व कलावती भगत (वय 88 वर्षे) हे या वृद्ध दाम्पत्याने दाखवून दिले आहे. कपडे शिवण्याच्या कलेच्या माध्यमातून आतापर्यंत या जोडप्याने हजार मास्क तयार करून सामाजिक संस्थांना विनामूल्य दिले आहेत. संकटकाळी समाजाला आधार देणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने युवकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

सविस्तर वाचा :नव्वद वर्षांचे 'कोरोना वॉरियर्स'... 'अशाप्रकारे' जपताहेत सेवा भाव

  • औरंगाबाद -कोरोनाने जिल्ह्याच्या पोलीस विभागात शिरकाव केला आहे. पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सविस्तर वाचा :औरंगाबाद पोलीस विभागात कोरोनाचा शिरकाव, पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना लागण

  • हिंगोली - जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'आम्हाला कोरोना झाला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पण संसर्ग केल्याशिवाय सोडणार नाही. तसेच आम्ही असेच फिरणार; तुम्ही आमचे अजिबात काहीही बिघडवू शकणार नाही', असे बोलून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.

सविस्तर वाचा :धक्कादायक! 'तुम्हाला कोरोनाची लागण केल्याशिवाय सोडणार नाही,' बाधित जवानांची रुग्णालयात दहशत

  • जळगाव - लॉकडाऊन काळात मद्याच्या साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी, माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या वाईन शॉपचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. शहरातील पोलन पेठेत भोळेंचे 'नीलम वाईन्स' नावाचे दुकान होते.

सविस्तर वाचा :मद्यसाठ्यात घोटाळा: भाजप आमदाराच्या पत्नीच्या नावावरील वाईन शॉपचा परवाना रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details