नवी दिल्ली - ईटीव्ही भारतला दक्षिण आशियातील 'सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप पुरस्कार' मिळाला आहे. डिजीटल मिडियामध्ये नाविन्यपूर्ण स्टार्टअपची सुरवात केल्यामुळे ईटीव्ही भारतला गौरवण्यात आले आहे. 'वर्ल्ड असोशिएशन ऑफ न्यूज पेपर अॅड न्यूज पब्लिशर'(WAN IFRA) या संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात आला आहे. ईटीव्ही भारतच्या व्यवस्थापकीय संचालिका बृहती चेरुकुरी यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला.
ईटीव्ही भारतला 'सर्वोत्तम डिजीटल न्यूज स्टार्टअप पुरस्कार'; बृहती चेरुकुरी यांनी स्वीकारला सन्मान
ईटीव्ही भारतच्या संचालिका बृहती चेरुकुरी यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला. 'वर्ल्ड असोशिएशन ऑफ न्यूज पेपर अॅड न्यूज पब्लिशर'(WAN IFRA) या संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
बृहती चेरुकुरी यांनी स्वीकारला पुरस्कार
'क्विंट माध्यम समूहाच्या संस्थापक रीतू कपूर यांच्या हस्ते बृहती यांनी हा कांस्य पुरस्कार स्वीकारला. शंभरपेक्षा जास्त माध्यम संस्था न्यूज एजन्सी या संस्थेच्या सदस्य आहेत. हा कार्यक्रम दोन दिवस आयोजित केला जाणार आहे. इनोव्हेशन इन टेक्नोलॉजी, मार्केटींग, डिजिटल मीडिया या विषयांवर दोन दिवसीय परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
Last Updated : Feb 18, 2020, 7:44 PM IST