महाराष्ट्र

maharashtra

कॅसिनोच्या पाण्याची नियमित मोजणी होणार - पर्यावरण मंत्री निलेश काब्राल

कॅसिनो प्रदूषण रोखण्यासाठी सरकार गंभीर आहे. यावर देखरेख करणाऱ्या समितीमध्ये राष्ट्रीय सागरी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या १ जुलैपासून मांडवीतील कॅसिनो दरदिवशी किती घेतात आणि त्याचा वापर करतात यावर दररोज देखरेख ठेवली जाणार आहे.

By

Published : Jun 15, 2019, 12:29 PM IST

Published : Jun 15, 2019, 12:29 PM IST

कॅसिनोच्या पाण्याची नियमित मोजणी होणार - पर्यावरण मंत्री निलेश काब्राल

पणजी - मांडवीतील कॅसिनो पाण्याचा किती प्रमाणात वापर करतात, यासाठी येत्या १ जुलैपासून पाण्याची मोजणी केली जाणार असल्याची माहिती गोव्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी १५ जून रोजी पत्रकार परिषदेत दिली.

सचिवालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री काब्राल म्हणाले, 'कॅसिनोमुळे प्रदूषण होत असून ते रोखण्यासाठी सरकार काहीच करत नाही, असा बिनबुडाचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. तसेच लोकांची दिशाभूल केली जाते. वास्तविक २०१४ पासून कॅसिनो देखरेख समिती आणि बंदर कप्तान विभागाकडून याची नियमित तपासणी केली जाते. कॅसिनोमधील मलनिस्सारण करण्यासाठी ते वापरत असलेली टाकी सीलबंद आणि उघडण्यासाठी सदर समिती आणि बंदर कप्तान यांच्या उपस्थितीत उघडून त्यामधील मैला जवळच असलेल्या टोंका-पणजी येथील मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया करण्यासाठी पाठविला जातो.

पर्यावरण मंत्री निलेश काब्राल

कॅसिनो प्रदूषण रोखण्यासाठी सरकार गंभीर आहे. यावर देखरेख करणाऱ्या समितीमध्ये राष्ट्रीय सागरी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या १ जुलैपासून मांडवीतील कॅसिनो दरदिवशी किती घेतात आणि त्याचा वापर करतात यावर दररोज देखरेख ठेवली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात सदर अहवाल लोकांसमोर ठेवला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना काब्राल म्हणाले, या माध्यमातून काही प्रमाणात का होईना रोजगार निर्मिती होत आहे. यातून सरकारला कर स्वरूपात महसूलही मिळत आहे. खाण उद्योग बंद करून काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच 'गेमिंग कमिशन ' आणले जाणार आहे. तसेच कॅसिनोमध्ये येणारी वाहने पार्किंग प्लाझामध्ये उभी करण्यासाठी सक्ती केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details