लंडन - विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने दक्षिण ऑफ्रिकेला १०४ धावांनी नमवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. बेन स्टोकने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या बळावर इंग्लंडने दक्षिण ऑफ्रिकेपुढे ३११ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ २०७ धावातच गारद झाला.
WC 2019 : सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी नमवले
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. बेन स्टोक ( ८९ ) जेसन रॉय ( ५४ ) आणि जो रुट ( ५१ ) यांनी इंग्लंडला ३११ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. बेन स्टोक ( ८९ ) जेसन रॉय ( ५४ ) आणि जो रुट ( ५१ ) यांनी इंग्लंडला ३११ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. दक्षिण आफ्रिकेचा संघ २०७ धावात गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ३ तर बेन स्टोक आणि प्लँकेटने प्रत्येकी २ बळी टिपले.