नवी दिल्ली– कोरोनाच्या महामारीत भूकंपाचे सौम्य धक्के तीन राज्यांना बसले आहेत. आसाममधील करीमगंज येथे आज सकाळी सात वाजून 57 मिनिटाला 4.1 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. गुजरातलाही भूकंपाचा धक्का बसला आहे. राजकोटमध्ये सकाळी सात वाजून 40 मिनिटाला 4.5 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला
गुजरात,आसामसह हिमाचल प्रदेशाला भूकंपाचा सौम्य धक्का
भूकंपामुळे कोणत्याही राज्यात जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशान्यकडील राज्यांत भूकंपाचे धक्के बसले आहे.
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातही आज पहाटे 4 वाजून 47 मिनिटाला भूकंपाचा सौम्य असा 2.3 रिश्टर क्षमतेचा धक्का बसला आहे. भूकंपामुळे कोणत्याही राज्यात जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशान्यकडील राज्यांत भूकंपाचे धक्के बसले आहे. ही माहिती राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राने दिली आहे.
भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार ईशान्य भारताकडील भाग हा जगातील सहाव्या क्रमांकाचा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. गुजरातमधील कच्छमध्ये रविवारी सकाळी आठ वाजून 13 मिनिटाला 5.7 रिश्टर क्षमतेचा भूंकपाचा धक्का बसला होता. गांधीनगर, अहमदाबाद, राजकोट, कच्छ, मोर्बी, जामनगर, पाटन व वडोदरामध्य चार ते नऊ सेकंदाचे धक्के बसले होते. या भूकंपाचे मुख्य केंद्र कच्छजवळ असल्याचा अंदाज आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी तातडीने राजकोट, कच्छ आणि पाटन जिल्हाधिकारींशी तातडीने फोनवरून संपर्क साधत माहिती घेतली होती.