महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'इतिहास सांगतो, चीननं सीमा करारांचं कधीही पालन केलं नाही' - माजी संरक्षण राज्यमंत्री

'भारत चीनमध्ये नियंत्रण रेषेसंबंधी आत्तापर्यंत जे काही करार झाले आहेत, त्याचं चीनने पालन केलं नाही, हे आपल्याला इतिहासातून दिसते. त्यामुळे नव्याने झालेल्या कराराचे चीन पालन करेल, याची शंका आहे', असे भारताचे माजी संरक्षण राज्य मंत्री पल्लव राजू म्हणाले.

file pic
माजी संरक्षण राज्य मंत्री पल्लम राजू

By

Published : Sep 11, 2020, 10:32 PM IST

नवी दिल्ली - रशियातील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकीच्या निमित्ताने भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांनी सीमेवरील तणावाच्या स्थितीवर चर्चा केली. तणाव कमी करण्याचे आश्वासन चीनन यावेळी भारताला दिले. मात्र, काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू यांनी चीनच्या आश्वासनावर शंका व्यक्ती आहे. इतिहास पाहता, चीनने कधीही सीमा करारांचे पालन केले नाही, असे ते मत त्यांनी मांडले.

भारत चीनमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन वाद चिघळला आहे. चीनने आक्रमक भूमिका घेत भारतीय भूमीत घुसखोरी केली आहे. चार महिन्यांपासून सीमावाद सुरू असून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. जयशंकर आणि वँग ई यांनी मास्कोतील चर्चेनंतर संयुक्त पत्रक जारी केले आहे. यामध्ये तणाव कमी करण्याचे आश्वासन दोन्ही देशांनी दिले आहे. सीमावाद मिटवण्यासाठी पाच मुद्द्यांवर काम करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू यांनी ईटीव्ही भारत याविषयी खास चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, 'कृती ही आवाजापेक्षा मोठी असते. मागील काही दिवसांपासून भारत चीनमध्ये कंमाडर स्तरावर अनेक बैठका झाल्याचे आपण पाहिलं आहे. दोन्ही देशातील करारांचे पालन करण्याचे या चर्चेत ठरले. मात्र, चीनने शब्द पाळला नाही.

'भारत चीनमध्ये नियंत्रण रेषेसंबंधी आत्तापर्यंत जे काही करार झाले आहेत, त्याचं चीनने पालन केलं नाही, हे आपल्याला इतिहासातून दिसतं. त्यामुळे नव्याने झालेल्या कराराचे चीन पालन करेल, ही शंका आहे' असे ते म्हणाले.

'सीमेवर जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, ती दोन्ही देशांसाठी चांगली नाही, असे मतावर दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री पोहचले. दोन्ही देशांतील मदभेद वादाचा मुद्दा होऊ द्यायचे नाहीत, हा पाच मुद्द्यांपैकी एक मुद्दा आहे. तणाव कमी करण्यासाठी भारत चीन सीमेसंबंधीच्या करारांचे पालन करावे, असे ठरले आहे'.

'भारत-चीन सीमेवर दिर्घकाळ लांबलेला तणाव दोन्ही देशांसाठी चांगला नाही. एप्रिल पूर्वीची स्थिती सीमेवर पुन्हा आणण्यासाठी चीनने कठोर भूमिका घेतली, हे दुर्देवी आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेतून सकारात्मक बाजू पुढे येईल, अशी आशा आहे, असे राजू यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

'सीमेवर सद्यस्थिती काय आहे, या माहितीची मागणी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदींकडे कायम केली आहे. चीनने मोठ्या प्रमाणात सैन्याची सीमेवर तैनाती केली आहे, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. आगामी संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा उठवणार आहोत. देशाच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी चिनने अतिक्रमण केल्याचे नाकारले, हे दुर्देवी आहे. सरकार सीमेवरील परिस्थितीवरून किमान आता जागं तरी झालं आहे. पंतप्रधानाच्या वक्तव्याने सीमेवरील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशाची सार्वभौमता राखण्यासाठी नवा निर्णय लागू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details