महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा : भाजप खासदार वीरेंद्र कुमार यांनी घेतली हंगामी अध्यक्षपदाची शपथ

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे वीरेंद्र कुमार खटिक यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यंकटेश नायडू यांची उपस्थिती होती.

By

Published : Jun 17, 2019, 1:23 PM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्षपदाची शपथ घेताना

नवी दिल्ली- सोमवारी डॉ. वीरेंद्र कुमार खटिक यांनी १७ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे वीरेंद्र कुमार खटिक यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यंकटेश नायडू यांची उपस्थिती होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि डॉ. वीरेंद्र कुमार खटिक

सदनातील सर्वात वरिष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले जाते. नवीन निवडुन आलेल्या सदस्यांना सदनाची शपथ देण्याचे काम हंगामी अध्यक्ष करतो. नवीन नियमित अध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर हंगामी अध्यक्षाचे काम संपुष्टात येते. त्यामुळे, टिकमगड येथून भाजप खासदार असलेले वीरेंद्र कुमार नियमित अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत लोकसभेचे कामकाज पाहणार आहेत.

डॉ. वीरेंद्र कुमार खटिक
वीरेंद्र कुमार माजी केंद्रीय मंत्री असून ते मध्यप्रदेशातून पहिल्यांदा १९९६ साली झालेल्या ११ व्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडुन आले होते. डॉ. वीरेंद्र कुमार खटिक सलग ७ वेळेस खासदार म्हणून निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार ४ वेळेस सागर मतदारसंघातून तर, ३ वेळेस टिकमगड येथून निवडून आले आहेत. दलित समुदायातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ साली त्यांनी अल्पसंख्यांक आणि महिला व बालविकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अर्थशास्त्र विषयातून पदव्यूत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details