महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गयामध्ये विलगीकरण कक्षात भरती असलेल्या महिलेवर डॉक्टराचा अत्याचार

महिलेला जनरल वॉर्डमध्ये हालविण्यात आले होते, नंतर महिलेला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. विलगीकरण कक्षात महिला एकटीच रहात होती. येथे रुग्णालयातील एका डॉक्टरने तिच्याशी दुष्कृत्य केले, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

isolation ward in gaya
प्रतिकात्मक

By

Published : Apr 11, 2020, 10:28 AM IST

गया (बिहार)- एका डॉक्टरने विलगीकरण कक्षात ठेवलेल्या एका २२ वर्षीय महिलेवर दुष्कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना शहरातील अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. या घटनेनतंर महिला अस्वस्थ झाली होती, त्यानंतर सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला होता.

मृत महिलेची प्रकृती खूप खराब होती. त्यामुळे, २७ मार्च रोजी तिला मगध वैद्यकीय रुग्णालयातील अती दक्षता वॉर्डात भरती करण्यात आले होते. त्यानंतर, उपचारार्थ महिलेला जनरल वॉर्डमध्ये हालविण्यात आले, नंतर महिलेला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. विलगीकरण कक्षात महिला एकटीच रहात होती. येथे रुग्णालयातील एका डॉक्टरने तिच्याशी दुष्कृत्य केले, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा-पंतप्रधान मोदी आज साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details