लखनऊ - उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देशातून संताप आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखले. तर, आज तृणमूल काँग्रेसच्या शिष्ठमंडळाला कुटुंबीयांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली. तेव्हा मला प्रश्न विचारण्यापेक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीतील दोन नेत्यांना प्रश्न विचारा, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि दिल्लीतील 'त्या' दोन नेत्यांना प्रश्न विचारा... हाथरस घटनेवरून पश्चिम बंगालचे खासदार संतापले
हाथरस घटनेनंतर देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐवरणीवर आला आहे. पीडीत कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हाथरस जिल्ह्यातही जोरदार निदर्शने सुरू आहेत. कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याला हाथरसमध्ये जाऊ दिले जात नाही. पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.
हाथरसमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. माध्यम प्रतिनिधींनाही जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. तृणमूल नेत्यांच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले आहे. यावेळी डेरेक ओ ब्रायन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, या प्रकरणावरून राजकारण करू नका, अशी विनंती त्यांनी सर्वांना केली. तसेच दिल्लीतील दोन नेते आणि योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारा, असे ते म्हणाले. दिल्लीतील दोन नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे त्यांचा रोख होता.
हाथरस घटनेनंतर देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐवरणीवर आला आहे. पीडीत कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून हाथरस जिल्ह्यातही जोरदार निदर्शने सुरू आहेत. कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याला हाथरसमध्ये जाऊ दिले नाही. पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.