महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डेंग्यू : काय करावे आणि करू नये..?

डेंग्यू...डेंग्यू...डेंग्यू... हा एकच शब्द आहे जो आपण सर्वत्र ऐकतो. जेव्हा एखाद्याला ताप येतो, संशयाची सुई त्याच्याकडे असते. हा सामान्य ताप असला तरीही, काही जणांसाठी तो आयुष्याला धोका निर्माण करणारा का झाला आहे? जागृतीचा अभाव हे प्रमुख कारण यासाठी आहे. कोणती खबरदारी घेतली पाहिजे?तो धोकादायक आहे, असे केव्हा समजावे?, विविध अवस्थांत कोणत्या प्रकारचे उपचार गरजेचे आहेत? तो कसा टाळता येईल? या संदर्भात, या भयंकर डेंग्यूची ही एकात्मिक कहाणी..

Dengue : What to do and what not to do

By

Published : Nov 13, 2019, 11:41 PM IST

विषाणूच्या संसर्गाने आलेला ताप आम्हाला माहीत आहे. दरवर्षी, जेव्हा मोसम बदलतो तेव्हा अशा समस्या वाढतात. पण नवीन धोका डेंग्यूचा आहे, जो सर्व वर्षभर धोका बनून राहिला आहे. अलीकडच्या काळात, ३.३ कोटी लोक या तापाने ग्रस्त झाले आहेत. १० कोटीहून अधिक लोक कोणतेही लक्षणे न दाखवता ग्रस्त आहेत. एकेकाळी, हा फक्त मुलांना आणि शहरांत दु:ख देत होता. आता, तो सर्व क्षेत्रांत, कोणत्याही वयाच्या लोकांना समस्या निर्माण करत आहे.

यापूर्वी, जेव्हा समस्या तीव्र असे तेव्हा, प्लेटलेट कमी होणे, रक्त घट्ट होणे, रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसत असत. आता, अशी लक्षणे प्रकटपणे दिसत नसली तरीही, मेंदू,हृदय आणि यकृतावर परिणाम करून तो गंभीर समस्या निर्माण करत आहे. डोळे आणि सांध्यांवरही तो परिणाम करत आहे. त्यामुळे, लोक त्याची भीती बाळगून आहेत. वस्तुतः,९८ टक्के लोकांसाठी तो डेंग्यू ताप म्हणून येतो आणि निघून जातो. काहीवेळा, तर लोकांना त्याच्या यातनांची जाणीव होत नाही. एकूण रूग्णांच्या केवळ एक टक्के रूग्णांमध्ये, गंभीर आजार म्हणून तो प्रकट होतो. सध्याच्या मृत्यूपैकी हा वर्ग समस्या आहे. योग्य उपचार घेतले तर, बहुतेक समस्या टाळता येतात. डासांचे चावे टाळण्याची खबरदारी घेतली तर, लागण होण्यापासून आम्ही सुटू शकतो. डेंग्यूबद्दल जागृती करण्याची आणि सतर्क राहण्याची गरज आहे.

डेंग्यूचे मूळ कुठे आहे?

डेंग्यूचे मूळ कारण फ्लॅव्हीव्हीरस हे आहे.यात डेंग्यूचे चार प्रकार आहेत- डेंग्यू१, डेंग्यू२, डेंग्यू३ आणि डेंग्यू ४. एडस इजिप्ती या मादी डास चावण्यामुळे याचा प्रसार होतो. डेंग्यूच्या एका प्रकारामुळे एखाद्याला ताप आला तर,त्याला तशा प्रकारचा ताप पुन्हा कधी येत नाही, पण त्याला इतर प्रकारच डास चावू शकतात. याचा अर्थ असा आहे की, एखाद्याला आपल्या आयुष्यात चार वेळा डेंग्यू होऊ शकतो. जर त्याला दुसर्या प्रकारच्या विषाणूमुळे ताप आला तर, मात्र तो अत्यंत तीव्र असू शकतो.

ज्याला डास चावला आहे त्या प्रत्येकाला तो होतो का?

नाही. डेंग्यू ज्या विषाणूमुळे होतो, तो विषाणू असलेला डास चावला तरच समस्या उद्भवते. जरी विषाणू असला तरीही, ताप येण्याची शक्यता नसते. याचे कारण असे आहे की, त्या व्यक्तीला मागे कधीतरी डेंग्यूने संसर्गाने ग्रस्त केलेले असते. विषाणूशी लढा देणारी तत्वे(प्रतिपिंडे) शरीरात असू शकतात. डेंग्यू विषाणूने शरीरात प्रवेश केला तरीही, प्रत्येकातच तापाची लक्षणे दिसत नाहीत. केवळ, १० टक्के लोकांमध्ये ही लक्षणे दिसतात. बहुतेक सर्वांमध्ये एक किंवा दोन लक्षणे आढळतात. काही जणांना तीव्र डोकेदुखी आणि शारीरिक वेदनांचा त्रास होतो.

रूग्णालयात केव्हा दाखल करावे?

पोटात दुखणे, सतत उलट्या होणे, पोट आणि छातीमध्ये द्रव साचणे, थकवा येणे, यकृताचा आकार वाढणे अशी लक्षणे दिसली की, रूग्णाला रूग्णालयात दाखल करावे. रक्तदाब उतरला, अनियंत्रित रक्तस्त्राव सुरू झाला, कोणताही अवयव निकामी झाला(छातीत वेदना, श्वसनाला त्रास, फिट्स आदी) लक्षण दिसली की, रूग्णास इस्पितळात नेण्यास मुळीच विलंब लावू नये. मधुमेह, उच्च तणाव, पोटाचा अल्सर, रक्तक्षय, गर्भवती महिला, लठ्ठ व्यक्ती, एक वर्षांच्या आतील मुले, वृद्ध लोकांना डेंग्यू तीव्रतेने ग्रस्त करू शकतो. त्यामुळे, अशा लोकांमध्ये लक्षणे स्पष्ट दिसत नसली तरीही त्यांना लगेच इस्पितळात दाखल करून उपचार सुरू करावेत.

स्थितीनुसार उपचार..

पॅरासिटामॉल माफक तापासाठी पुरेसे आहे. जर उलट्या नसतील तर, ओआरएस औषध द्यावे. जर उलट्या कमी होत असतील तर ओआरएस औषध सुरू ठेवावे. विशेषतः, मुलांची काळजी घेतली पाहिजे. त्याना रूग्णालयात ताबडतोब दाखल केले जावे. प्लेटलेट पेशी कमी होत आहेत, रक्त घट्ट होणे अशी लक्षणे दिसत असतील तर हेमाटोक्रीट, प्लेटलेट तपासणीसाठी रक्त चाचणी नियमित अंतराने करून घ्याव्या. जर अन्न तोंडाने घेता येत नसेल, किंवा हिमोग्लोबीन टक्केवारी वाढली असेल किंवा रक्तदाब खाली आला असेल तर, सलाईन दिले जावे. फुफ्फुसात द्रव गेल्याने श्वसनाचा त्रास होत असेल तर, व्हेंटिलेटरची व्यवस्था करून उपचार सुरू ठेवावेत. पोट आणि फुफ्फुसातून द्रव पदार्थ काढण्याचा प्रयत्न करू नये. जर तसे केले तर रक्तस्त्रावाचा धोका आहे. यकृत आणि हृदय यांसारखे अवयव खराब झाले तर, त्यानुसार उपचार करावे लागतात.

रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळतो?

  • कोणत्याही पॅरासिटामॉल गोळ्या न देताही दोन सलग दिवस ताप नसेल तर.
  • जेव्हा भूक सामान्यपणे पुन्हा परतते.
  • जेव्हा नाडीची गती, श्वसनाचा दर आणि रक्तदाब सामान्य होतात.
  • जेव्हा लघवी कोणताही त्रास न होता बाहेर जाते.
  • जेव्हा प्लेटलेट किमान ५०,००० पेक्षा जास्त असतात, आदर्श म्हणजे एक लाखापेक्षा जास्त असाव्या.
  • हेमाटोक्रीट सलाईन न देताही सामान्य असते.

बरे होण्याची अवस्था कधी असते?

ताप उतरला की, प्लेटलेट पेशी तीन ते पाच दिवसात वाढतात. नाडीचा वेग, रक्तदाब, श्वसन सामान्य होते. उलट्या होऊ नयेत, पोटदुखी गायब असली पाहिजे, भूक वाढते, लघवी व्यवस्थित होते, हिमोग्लोबिनचे प्रमाण सातत्यपूर्ण राहते, ही सर्व लक्षणे ताप जात असल्यची आहेत. काहीमध्ये, खाज सुटते पण त्याची काळजी करण्याची गरज नाही.

लक्षणे..

डास चावल्यावर डेंग्यू संसर्ग ३ ते १४ दिवसात होतो. यात लवकरची, गंभीर, दिलासा अशा अवस्था येतात. पहिली अवस्था पाच दिवसात तर गंभीर दोन ते तीन दिवसात असते.

पहिल्या अवस्थेत :

  • अचानक उच्च ताप येतो.
  • डोकेदुखी सणकून.
  • डोळ्यामागे वेदना.
  • उलट्या होताता.
  • शरीरात आणि सांधे दुखतात.
  • भूक हरवते.

गंभीर अवस्था :

  • पोटात वेदना.
  • पोट किंवा छातीत द्रव साचते.
  • वारंवार उलट्या.
  • हिरड्यामधून रक्त गळते.
  • त्वचेवर लाल डाग.
  • रक्तदाब उतरतो, बेशुद्ध अवस्था.
  • हात आणि पाय गार पडतात.
  • अशक्तपणा आणि अस्वस्थपणा.
  • गुंगी.
  • यकृताचा आकार वाढतो.
  • शरीरातील हिमोग्लोबीन वाढते.
  • प्लेटलेट पेशींची संख्या झटकन उतरते.

निदान कसे करावे?

ताप सुरू झाला की, एसएस १ अँटीजेन चाचणी करावी. ती जर सकारात्मक आली तर रूग्णाला डेंग्यू आहे. पाच दिवसांनंतर असेल तर, आयजीएम चाचणी करावी कारण त्या टप्प्यात अँटीजेन दिसत नाहीत. आयजीएम सकारात्मक असेल तर, डेंग्यू अजूनही आहे. अनेक झटपट निदान चाचण्यांत डेंग्यू सकारात्मक असेल तर, निदान पक्के करण्यासाठी आदर्श चाचण्या कराव्या लागतील. गरज भासल्यास, आयजीजी चाचणी केली जावी. ज्या लोकांना डेंग्यू लवकर होतो. त्यांना ही चाचणी सकारात्मक येते. याचा अर्थ, डेंग्यूने दुसर्यांदा किंवा तिसर्यादा हल्ला केला आहे. हा डेंग्यू धोकादायक असल्याने, आयजीजी चाचणी काळजीपूर्वक करावी.

हे करा आणि हे करू नका..

  • तुम्ही पॅरासिटामॉल ताप खाली आणण्यासाठी घेऊ शकता
  • ब्रुफेन, अनाल्जीन, डीक्लोफेनक, अस्पिरीन हे घेऊ नका
  • इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेतले जाऊ नयेत
  • अँटीबायोटिक, अँटीव्हायरल औषधे घेतले जाऊ नयेत
  • रक्त, प्लेटलेट, सलाईन आवश्यक नसेल तेव्हा शरीरात घुसवू नये. डॉक्टरवर दबाव आणू नये.ल
  • पुरेसे द्रवपदार्थ घ्यावे
  • चांगली विश्रांती घ्यावी
  • ताप उतरल्यावर, जास्त काळजी घेतली पाहिजे.
  • अनावश्यक फळे आणि फळांचा रस घेऊ नये. त्यामुळे रक्तात पोटॅशियम वाढते आणि हृदयाचे ठोके अनियमित होतात.
  • जर ताप सुरूच राहिला आणि उलटी होत नसेल आणि रूग्ण खाऊ शकत असेल तर, अन्न घेऊ शकतो.
  • ताप उतरल्यावर सामान्य अन्नपदार्थ घेऊ शकतो. विशेष अन्नाची गरज नाही.
  • पपईच्या रसाने प्लेटलेट संख्या वाढते. पण त्यामुळे डेंग्यू कमी होत नाही.ल म्हणून केवळ यावर अवलंबून राहू नये आणि उपचार टाळू नयेत.

ताप उतरल्यावर अधिक धोका..

ताप जास्त असल्यावरच आपण रूग्णालयात राहावे, असे लोकांना वाटते. एकदा तो उतरला की, घरी जाण्यासाठी ते आग्रह धरतात. प्रत्यक्षात, खरा धोका हा तापमान सामान्य स्थितीत आल्यावर असतो. रक्तदाब, प्लेटलेटची संख्या कमी होण्यास सुरूवात होते. म्हणून, ताप उतरला आहे म्हणून आता काही पश्न नाही असे समजू नये. अधिक दक्ष राहिले पाहिजे.

बाहेरुन प्लेटलेट्स दिल्या जातात का? कुणासाठी?

प्रत्येक डेंग्यू रूग्णाला बाहेरुन प्लेटलेट्स देण्याची गरज नाही. एक लाखापेक्षा त्यांची संख्या कमी येते. डॉक्टरच्या देखरेखीखाली ते असावेत. ५० हजारपेक्षा त्यांची संख्या कमी आली तर, रूग्णाला इस्पितळात दाखल करावे आणि त्याच्यावर बारकाईने नजर ठेवावी. प्लेटलेट २० हजारपेक्षा कमी आल्या तर रक्तस्त्रावाची लक्षणे दिसू लागतात आणि प्लेटलेट बाहेरून द्याव्या लागतात. जर त्या १० हजार पेक्षा कमी आल्या तर रक्तस्त्राव झाला तरी त्या बाहेरून द्याव्या लागतात.

खबरदारी महत्त्वाची..

डेंग्यूला टाळणे कधीही चांगले. डास आपल्याला चावणार नाहीत,याची दक्षता घेतली तर आपण डेंग्यू टाळू शकतो. घराजवळ पाणी साचणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे. मच्छरदाणी वापरली पाहिजे. पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि पँट घातले पाहिजे. डास प्रतिबंधक मलम हात आणि पायांना लावले पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details