नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारच्या सुमारास याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सध्या दिल्लीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद आहेत. यामध्ये आता काहीशी सूट मिळू शकते. शनिवारी दिल्ली कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये इतर आस्थापनांनाही सूट दिली जावी आणि सरकारचे सर्व विभाग थोड्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करावेत, यावर चर्चा झाली असून त्यासंदर्भात आदेशही काढण्यात आला आहे.